जिल्हा

ठाणे सिव्हिलमध्ये मौखिक कर्करोगावर यशस्वी मात

ठाणे सिव्हिलमध्ये मौखिक कर्करोगावर यशस्वी मात
ठाणे सिव्हिलमध्ये मौखिक कर्करोगावर यशस्वी मात फोटो: ठाणे वैभव
* ५३ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान * १४ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया ठाणे: तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, जीभ जाड होणे किंवा न भरून येणारी जखम ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेत तपासणी केल्यास या आजारावर यशस्वी मात करता येते, हे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने सिद्ध केले आहे. २०१५ पासून येथे ५३ रुग्णांमध्ये मौखिक कर्करोगाचे निदान झाले असून १४ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणीसाठी आलेल्या २५१ रुग्णांपैकी २०९ रुग्णांमध्ये कर्करोगाचा संशय आढळला. त्यापैकी ९२ रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. तपासणीनंतर ५३ रुग्णांना मौखिक कर्करोग असल्याचे निदान झाले असून १४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील ५८ वर्षीय सरिता (नाव बदललेले) यांना जीभ जाड होणे आणि बोलताना त्रास होत होता. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. उपचारासाठी मोठा खर्च सांगितल्याने त्यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतले. असेच ठाण्यातील ७० वर्षीय शांताराम जाधव (नाव बदललेले) यांना अनेक वर्षांच्या तंबाखू सेवनामुळे जिभेचा कर्करोग झाला होता. सिव्हिल रुग्णालयात बायोप्सीद्वारे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतामध्ये दरवर्षी सुमारे एक लाख नवीन मौखिक कर्करोग रुग्ण आढळून येतात. तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपान हे या आजाराचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र वेळेत निदान झाल्यास आणि योग्य उपचार मिळाल्यास या आजारावर यशस्वी मात करता येत असल्याची माहिती दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, न भरून येणारी जखम, तोंड उघडताना त्रास किंवा सतत वेदना जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. "मौखिक कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. तोंडात कोणताही संशयास्पद बदल दिसल्यास नागरिकांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या दंत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600