जिल्हा

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना

५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना
५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना फोटो: ठाणे वैभव
ठाणे: पर्यावरणपूरक बाप्पा गेल्या अनेक वर्षांपासून सातासमुद्रापार अमेरिकेतील गणेशभक्तांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होत आहे. यंदाही श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या प्रथमेश इकोफ्रेंडली आर्टने साकारलेल्या ५० इकोफ्रेंडली गणेशमूर्ती अमेरिकेतील टेक्साससह विविध शहरांसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यात साडेसहा फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचाही समावेश आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणारा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा उत्सव तितक्याच भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मागील काही वर्षांत पर्यावरणाबाबतची जागरूकता वाढल्याने परदेशातील गणेशभक्तांकडूनही इकोफ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी वाढली आहे. कुर्ला येथे प्रथमेश इकोफ्रेंडली आर्टमध्ये तयार होणाऱ्या या मूर्ती कागदी लगद्यापासून बनवल्या जातात. मूर्ती निर्मितीत सुमारे ६० टक्के कागद, ३० टक्के गोंद आणि १० टक्के गुजरातमधून आणलेली विशेष व्हायटिंग माती वापरण्यात येते. या मिश्रणामुळे मूर्ती हलक्या, आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनतात. विसर्जनानंतर त्या सहज विरघळून पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम करत नाहीत. "बाप्पा ही श्रद्धेची ओळख आहेच, पण आता तो पर्यावरणप्रेमाचाही संदेश देत आहे. जगभरातील गणेशभक्त मूर्ती निवडताना पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही परदेशात इकोफ्रेंडली मूर्ती पाठवत आहोत. यंदाही मूर्ती वेळेत आणि सुरक्षितपणे गणेशभक्तांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती प्रथमेश इकोफ्रेंडली आर्टचे संदीप गजाकोश यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475