जिल्हा

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा कळव्यातून जेरबंद

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा कळव्यातून जेरबंद
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा कळव्यातून जेरबंद फोटो: ठाणे वैभव
ठाणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई ठाणे: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे सत्र देशभर सुरू असताना ठाणे शहरातील कळवा भागातून एकास पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविण्याच्या संशयावरून एका २७ वर्षांच्या तरुणास अटक करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. अटक आरोपी ठाण्यातील कळवा येथे राहणारा असून तो मुंबईतील एका खासगी डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीत कामाला आहे. त्या तरुणाला ठाणे न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संशयित तरुण पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) यांच्या संपर्कामध्ये असून त्या व्यक्तीने भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरविली आहे, अशी गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (मुंबई) माहिती मिळाली होती, त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या चौकशीत सदर व्यक्तीची नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकद्वारे एका पीआयओसोबत ओळख झाली होती. तेव्हापासून म्हणजे नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत तो पीआयओला व्हॉट्सॲपद्वारे भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला आणि त्याच्या संपर्कातील इतर दोन व्यक्ती अशा एकूण तिघांविरोधात दहशतवाद विरोधी पथक पोलिस ठाणे येथे शासकीय गुपीते अधिनियम १९२३ चे कलम ३(१) (ब), ५ (अ) सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयीत व्यक्तीस अटक करण्यात आली असून दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475