जिल्हा

खुल्या प्रवर्गाचे एकच तिकीट; उमेदवारांची होणार पायपीट

खुल्या प्रवर्गाचे एकच तिकीट; उमेदवारांची होणार पायपीट
खुल्या प्रवर्गाचे एकच तिकीट; उमेदवारांची होणार पायपीट फोटो: ठाणे वैभव
* २२ प्रभागांत पुरुष उमेदवारांची कोंडी * अनेक इच्छुकांमुळे पक्षनेत्यांना करावी लागणार तारेवरची कसरत ठाणे: ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक फटका खुल्या वर्गातील पुरुषांना बसला असून ११ प्रभाग वगळता इतर प्रभागांत खुल्या वर्गातील फक्त एकाच पुरुष उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार आहे. त्यामुळे या प्रभागांतील तिकीट वाटप करताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत १३१ नगरसेवकांचे ३३ प्रभाग असून त्यामध्ये ६६ जागा महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ३५ जागा या इतर मागासवर्गीयांकरिता राखीव आहेत. अनुसूचित जातीकरिता नऊ .आणि अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण गटाकरिता ८४ जागा असून त्यामध्ये सर्वसाधारण गटातील महिलांना ४१ जागा तर पुरुषांकरिता ४३ जागा आहेत. या खुल्या गटाच्या जागेवर महिला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत, परंतु महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे खुल्या वर्गातील पुरुषांना प्रभाग क्र.३,६,७, ८, १०,१४, १७, १८, १९, २४ आणि २६ या प्रभागात खुल्या वर्गातील पुरुषांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे तर उर्वरित प्रभागांत मात्र केवळ एकच खुल्या वर्गातील पुरुष निवडणूक लढवू शकणार आहे. अनेक प्रभागांत ओबीसी आणि नऊ अनुसूचित जाती करिता राखीव असलेल्या प्रभागात पाच ठिकाणी महिला तर चार ठिकाणी अनुसूचित जातींचे पुरुष निवडणूक लढवू शकणार आहेत तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या एका जागेवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे. ओबीसीकरिता राखीव असलेल्या १७ जागांवर ओबीसी पुरुष आणि महिलाच निवडणूक लढवू शकणार आहेत, त्यामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना जास्त प्रभागात आपले नशिब आजमावता येणार नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475