महाराष्ट्र
अमेरिकेच्या स्पेस स्पर्धेत श्री चैतन्य टेक्नो स्कूल विश्वविजेते
अमेरिकेच्या स्पेस स्पर्धेत श्री चैतन्य टेक्नो स्कूल विश्वविजेते
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : श्री चैतन्य टेक्नो स्कूलने अमेरिकेच्या एन.एस.एस स्पेस स्पर्धेत सलग 11 व्यांदा विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेत 28 देश सहभागी झाले होते. यामध्ये श्री चैतन्यच्या विद्यार्थ्यांनी भारताला पहिल्या स्थानावर पोचवले.
श्री चैतन्यच्या संचालिका सीमा यांनी सांगितले की, एनएसएसतर्फे 3 रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यापैकी दोन रोख बक्षिसे श्री चैतन्य शाळेने पटकावली आणि हा बहुमान दुसऱ्यांदा श्री चैतन्य शाळेला मिळाला आहे.
श्री चैतन्यच्या संचालिका सीमा म्हणाल्या की, आजपर्यंत भारतामध्ये इतर कोणत्याही शाळेने ही कामगिरी केलेली नाही. त्याचप्रमाणे सात प्रकल्पांसाठी प्रथम आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 प्रकल्पांसाठी द्वितीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 15 प्रकल्पांसाठी तृतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आणि 29 प्रकल्पांसाठी विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. एकूण पारितोषिक 62 ही केवळ श्री चैतन्य यांनीच मिळवले. जिंकलेल्या या 62 प्रकल्पांमध्ये श्री चैतन्यच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केल्याची माहितीही त्यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475