महाराष्ट्र

दुस-याने रेशन घेतल्यास येणार मूळ लाभार्थ्याला येणार संदेश

दुस-याने रेशन घेतल्यास येणार मूळ लाभार्थ्याला येणार संदेश
दुस-याने रेशन घेतल्यास येणार मूळ लाभार्थ्याला येणार संदेश फोटो: ठाणे वैभव
ठाणे : स्वत:च्या आपल्या शिधापत्रिकेवर शिधा आणि जिन्नस घेतल्यास तसा मेसेज संबंधित शिधापत्रकधारकाच्या मोबाईलवर येतो. मात्र अन्य व्यक्तीने जरी शिधापत्रिकेवर सवलतीच्या अन्नधान्याचा लाभ घेतल्यास संबंधित मेसेज त्वरित ‘जनरेट’ होऊन मोबाईलवर वाचायला मिळत आहे. त्यामुळे आता आपल्या नावावरील अन्नधान्य कोणालाही घेता येणार नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. सर्व शिधावाटप कार्यालये याबाबत कॅम्प घेतात आणि धान्य घेण्यासाठी लाभार्थीही अधिकृत शिधावाटप दुकानांमध्ये गेल्यानंतर पोस्ट मशीनद्वारे मोबाईल क्रमांक ट्रेडिंग सिस्टीमवर ‘अपलोड‘ करण्यात येते, अशी माहिती शिधावाटप अधिका-यांनी दिली. तब्बल सव्वा सहा लाख कार्डधारकांनी हा हेल्पलाईन क्रमांक मोबाईलला जोडला आहे. शहराच्या परिमंडळातंर्गत सहा लाख 82 हजार 382 शिधापत्रिका धारकांनी क्रमांक जोडलेला आहे. त्यापैकी सहा लाख तीस हजार 283 शिधापत्रिका धारकांचे मोबाईल नंबर जोडले आहेत. याची टक्केवारी सरासरी 92.37 एवढी आहे. मोबाईल क्रमांक जोडणी केलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंब प्रमुखाला त्यांना देय असलेल्या शिधा जिन्नसांची माहिती प्रत्येक महिन्यात देण्यात येते. जिन्नसांची यादी ‘क्टिव्हेट’ झाल्यानंतर सिस्टम जनरेटेड एसएमएसद्वारे देण्यात येते. हे अन्नधान्य भारत सरकारच्या निर्णयानुसार नि:शुल्क आहे. मात्र धान्य घेतल्यानंतर पावती आवश्यक घ्यावी. यासाठी ‘पीडीएस हेल्पलाइन १८००२२१५ असा आहे. शिधा जिन्नस वाटपामध्ये बायोमेट्रिक आॅथेंटीकेशन मोबाईल नंबर असून, या सर्वांचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे शिधाजिन्नस वाटपामध्ये पारदर्शीपणा आला आहे, असे ठाणे शिधावाटपच्या अधिका-यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475