जिल्हा
निर्माणधीन इमारतीचे संरक्षक पत्रे पडून अनेक वाहनांचे नुकसान
निर्माणधीन इमारतीचे संरक्षक पत्रे पडून अनेक वाहनांचे नुकसान
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत.
घणसोली सेक्टर-१०, भूखंड क्र. ८ येथील एका बांधकाम प्रकल्पावरील लोखंडी पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून रस्त्यालगत उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.
पावसाळ्यात खोदकाम बंद ठेऊन सुरक्षा बाळगण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले असून देखील शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे अशा घटना घडून नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. अशा बांधकाम ठिकाणी सुरक्षात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475