जिल्हा

ज्येष्ठ माजी नगरसेवक दिलीप ओवळेकर यांचे निधन

ज्येष्ठ माजी नगरसेवक दिलीप ओवळेकर यांचे निधन
ज्येष्ठ माजी नगरसेवक दिलीप ओवळेकर यांचे निधन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्व.आनंद दिघे यांचे सहकारी दिलीप ओवळेकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील होते. त्यांनी ज्यूपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. १९६८ साली त्यांनी शाखाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकीर्दची सुरुवात केली. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आदीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रभागात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे जोरदार आयोजन ते करत होते. तसेच अनेक आदिवासी भागातील लोकांना स्वखर्चातून कामे करून दिली. घोडबंदर परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप ओवळेकर यांनी बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला साथ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिलीप ओवळेकर यांच्या जाण्याने घोडबंदरमधील शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475