जिल्हा

भिवंडीत गावठी दारूच्या उत्पादनावर कारवाई

भिवंडीत गावठी दारूच्या उत्पादनावर कारवाई
भिवंडीत गावठी दारूच्या उत्पादनावर कारवाई फोटो: ठाणे वैभव
अवैध दारूचा साठा जप्त भिवंडी: पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूनंतर भिवंडीतील राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी भिवंडीतील ग्रामीण भागात कारवाई करीत लाखो रुपयांचे हातभट्ट्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भिवंडीच्या ग्रामीण भागात खाडीच्या किनारी असलेले कालवार, केवणी, खर्डी, वडूनवघर या ठिकाणी हातभट्टीची दारू बनविणारे अड्डे उद्ध्वस्त केले. तसेच इतर सर्व ठिकाणी केलेल्या कारवाईत २९ गुन्हे दाखल केले असून त्यापैकी १९ आरोपींवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. इतर १० ठिकाणी घटनास्थळी आरोपी सापडले नाहीत. या कारवाईत २२५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर इतर ठिकाणचे हातभट्टीची दारू बनविणारे अड्डे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्त केले. तसेच देशी, विदेशी मद्य, २३,२०० लिटर रसायन आणि एक वाहन असा एकूण १० लाख ३६,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे कारवाई १ ते ३१ मे दरम्यान करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भिवंडी विभागीय कार्यालयाचे पोलीस निरीक्षक एस.एस. खंडेराय यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग व ठाणे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक एस.एस. खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी दुय्यम निरीक्षक आप्पा चव्हाण, संजय वाकचौरे, सहायक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे, जवान नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे आणि स्वरुपा भोसले या पथकाने ही कामगिरी बजावली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475