जिल्हा

स्वमग्न ध्रुवांश थोरात गणितात तज्ञ!

स्वमग्न ध्रुवांश थोरात गणितात तज्ञ!
स्वमग्न ध्रुवांश थोरात गणितात तज्ञ! फोटो: ठाणे वैभव
कोणत्याही संख्येचे वर्गमूळ झटपट बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या सोनिवली येथील शाळेत तिसरीमध्ये शिकत असलेला दहा वर्षीय ध्रुवांश थोरात गणित विषयात तरबेज असून कोणत्याही संख्येचे वर्गमुळ तसेच कोणत्याही प्रकारची भागाकाराची गणिते अगदी सहज सोडवतो. विशेष म्हणजे तो स्वमग्न म्हणजे ऑटिझमग्रस्त आहे. जागतिक स्वमग्न (ऑटीझम) जनजागृती दिवस 2 एप्रिल रोजी साजरा झाला. बदलापूर नगरपालिकेच्या 16 शाळा असून त्या शाळांमध्ये किमान 70 दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात. बदलापूर नगरपालिकेच्या सोनिवली येथील शाळेत ध्रुवांश थोरात हा ऑटीझमग्रस्त विद्यार्थी शिक्षण घेतो. ध्रुवांश हा गणित विषयामध्ये प्रवीण आहे, असे त्याच्या शिक्षकांनी सांगितले. त्याच्या शिक्षणाची सर्व प्रकारची जबाबदारी घेण्याचे शाळेच्या मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी त्याच्या पालकांना सांगितले. ध्रुवांश २०२३ सालापासून सोनिवली शाळेमध्ये असून प्रसिद्ध चित्रपट थ्री इडीयट्समधील रांचोप्रमाणे ध्रुवांश पहिली ते पाचवीच्या सर्व वर्गांमध्ये जाऊन बसतो. त्याला आवडेल तो विषय बघतो. विशेषत: त्याला गणित खूप आवडते. तो कोणत्याही संख्येचे वर्गमूळ सहजरित्या काढतो. गुणाकार सहज करतो. तो गणितामध्ये प्रविण आहे. त्याला गणिताचे व्हिडिओ बघायची खूप आवड आहे. ध्रुवांश भविष्यात शास्त्रज्ञ होणार असे शिक्षिका माधवी धांडे म्हणाल्या. वर्गात पहिल्या बेंचवरच बसायला त्याला आवडतं. त्याला साजेसे पोषक वातावरण येथील शिक्षकांनी केले असून येथील शिक्षिका माधवी धांडे, पद्मजा देसाई यांनी इतर विद्यार्थ्यांना ध्रुवांशला कसे सहकार्य करायचे, त्याला कसे समजून घ्यायचे याबाबत विशेष सूचना देतात. ध्रुवांशला सोनिवली शाळेतील मुख्याध्यापक प्रकाश पाटील, सहयोगी शिक्षिका माधवी धांडे यांनी बालमानसशास्त्र याचा अभ्यास करून घेतला. श्रीमती देसाई यांनीही ध्रुवांशसाठी वाचन करुन त्याच्यावर उत्तम संस्कार केले. शाळेच्या मानद शिक्षिका प्रीतम सैद आणि रुपाली डबरे तसेच जेवण (शालेय पोषण आहार) बनविणाऱ्या मीनाताई यांचेही भरपूर प्रेम ध्रुवांशला मिळत आहे. पंचायत समिती विशेष तज्ञ शिक्षिका श्रीमती चिमकर या देखील ध्रुवांशला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उप नगराध्यक्षा तसेच शिक्षण समिती सभापती प्रियंका दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचे नगरपालिका शाळांना नेहमी प्रोत्साहन मिळते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475