महाराष्ट्र

सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे

सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे
सफाई कामगारांना मिळणार हक्काची घरे फोटो: ठाणे वैभव
रखडलेल्या प्रकल्पाचे आ.संजय केळकर यांच्याहस्ते भूमीपूजन ठाणे : भाजप आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारामुळे ठाण्यातील सफाई कामगारांना हक्काची घरे मिळणार आहेत. गुरुवारी महागिरी येथील या पुर्नविकास प्रकल्पाचे भूमीपूजन आ. केळकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी माजी नगरसेविका नम्रता कोळी, भाजप उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, परिवहन सदस्य विकास पाटील, शांताबेन सोलंकी, विशाल वाघ आणि विकासक मुनीरभाई आदी उपस्थित होते. ठाणे पश्चिमेकडील बाजारपेठेलगत महागिरी परिसरातील राम मंदिर येथे वास्तव्य करणाऱ्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. ठाणे महापालिका सेवेतील सफाई कामगार राहत असलेल्या इमारती धोकादायक असल्यामुळे त्यांची घरे रिकामी करण्यात येऊन, त्यांची इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेली पाच वर्षे ह्याचा पाठपुरावा आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरु होता. अखेर अनेक वर्षे रखडलेल्या श्रीराम को.ऑप. हाऊसिंग सोसायटी महागिरी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी आ. केळकर यांच्या हस्ते पार पडला. एकीकडे संपूर्ण देशात राममंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा जल्लोष सुरू आहे तर आणि श्रीराम को ऑप हौसिंग सोसायटीचे भूमिपूजन आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याने करण्यात आले आहे. जणू आमच्या मदतीला श्रीराम धावून आले आहेत,अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475