महाराष्ट्र

कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजनाला राडा

कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजनाला राडा
कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजनाला राडा फोटो: ठाणे वैभव
आमदारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ते, रहिवासी आणि शाळेचे पालक भिडले कल्याण : कल्याण पूर्वेत रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या दरम्यान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते, स्थानिक नागरीक आणि शाळेच्या पालकांमध्ये राडा झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक वर्षापासून हा रस्ता आहे. शासकीय निधीतून या रस्त्याचे काम होणार आहे, असे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले तर भूमिपूजनास विरोध करणाऱ्या नागरिकांनी ही चर्चची खासगी जागा असून या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच काम सुरू करताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचेही ते म्हणाले. कल्याण पूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे. या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमीपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भूमीपूजन होणार होते. भाजप आमदार गायकवाड भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचले. त्याठिकाणी सेंट ज्यूड्स शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरीक जमा झाले. सेंट ज्यूड्स शाळेचे पालक व काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान जरीमरी नगर परिसरातील नागरिक शाळेचे पालक यामध्ये जोरदार राडा झाला. चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, ही जागा चर्चची आहे. रस्ता देखील चर्चचा आहे. दादागिरी करुन आमच्या जागेवर काम केले जात आहे. आमच्या लोकांना मारहाण झाली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला आणि लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत भाजप आमदार गायकवाड यांचे म्हणणे आहे की, हा आरक्षित भूखंड आहे. सरकारने रस्त्यासाठी निधी दिला आहे. कोणी रस्ता बंद करुन शकत नाही. आम्ही भूमीपूजन केले आहे. रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील नागरिकांनी देखील आम्ही येथे ४० ते ५० वर्षांपासून राहत असून आमच्या येण्याजाण्याचा हा रस्ता आहे, असे सांगितले. रस्ता सुस्थितीत नसल्याने आमदारांकडे हा रस्ता बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475