जिल्हा

देशालाच कार्यक्षेत्र समजतो: समीर वानखेडे

देशालाच कार्यक्षेत्र समजतो: समीर वानखेडे
देशालाच कार्यक्षेत्र समजतो: समीर वानखेडे फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: मी माझ्या देशालाच कार्यक्षेत्र समजतो. त्यामुळे जिथे जाईन तिथे देशाची सेवाच करेन, असे प्रतिपादन आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी केले. त्यांच्यावर झालेल्या टीकेकडे इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन विषयक व्याख्यान मालिकेचे पहिले पुष्प आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी गुंफले. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना एकाग्र मनोवृत्ती आणि आपण ही परिक्षा नेमकी का देतोय? याची भूमिका तुमच्या मनात स्पष्ट असायला हवी. तसेच अधिकारी होणे हे राष्ट्रकार्य आहे. त्यामुळे अधिकारी झाल्यावर तुमच्यावर कितीही आघात झाले तरी शांत डोक्याने संविधान मनात ठेवून योग्य ती कृती करावी. मी आजवर ३५०० हून अधिक केसेस केल्या आहेत. या काळात माझ्यावर खूप दबाव आला. पण त्या दबावापुढे मी झुकलो नाही. उलट माझ्यावर झालेल्या टीकेकडे मी इन्फोटेन्मेंट म्हणून पाहिले. राजकीय क्षेत्र, कथित सेलिब्रिटी यांतील काहींनी माझी प्रचंड बदनामी केली. पण त्याच्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले. यावेळी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांची त्यांनी माहिती दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी समीर वानखेडे यांच्या कार्याचे कौतुक करत स्वामी विवेकानंद ट्रेनिंग सेंटरच्या कार्याची माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश म्हस्कर यांनी स्पर्धा परिक्षा विषयक व्याख्यानमालेची रूपरेषा सांगत क्लबच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तुषार साटपे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुतेजा स्वामी यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475