जिल्हा
मानव मोरे आणि आयुष तावडे पोहणार सलग २४ तास
मानव मोरे आणि आयुष तावडे पोहणार सलग २४ तास
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष, प्रजासत्ताक दिन आणि स्व.आनंद दिघे जयंतीनिमित्त सलग 24 तास पोहण्याचा विक्रम करुन अनोखी सलामी देणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 26 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता मानव मोरे आणि आयुष तावडे हे दोन जलतरणपटू सलग 24 तास जलतरण करण्याच्या विक्रमी मोहिमेची सुरूवात करणार आहेत. मानव मोरे याने राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे तर आयुष तावडे याने राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग येथे होणाऱ्या सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वी केल्या आहेत. येत्या 26 जानेवारीला 24 तास पोहण्याचा विक्रम हे दोघे जलतरणपटू करणार असून याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे.
महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475