देश-विदेश

रशियाने युक्रेनवर सोडले एकाचवेळी २७३ स्फोटक ड्रोन

रशियाने युक्रेनवर सोडले एकाचवेळी २७३ स्फोटक ड्रोन
रशियाने युक्रेनवर सोडले एकाचवेळी २७३ स्फोटक ड्रोन फोटो: ठाणे वैभव
कीव: युक्रेनवरील हल्ल्यात रशियाने एकाचवेळी तब्बल २७३ ड्रोन डागले. हा हल्ला २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. कीव प्रदेशात झालेल्या या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहे. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. रशियाने एकूण २७३ स्फोटक ड्रोन सोडले. यापैकी ८८ ड्रोन पाडण्यात आले. तर इलेक्ट्रॉनिक जामिंगमुळे १२८ ड्रोन निष्क्रिय झाले. एकूण, युक्रेनने ६०टक्केपेक्षा जास्त हल्लेखोर ड्रोन निष्क्रिय केले, परंतु हल्ल्यांचा परिणाम अजूनही विनाशकारी होता, अशी माहिती युक्रेनियन हवाई दलाने दिली. कीवच्या गव्हर्नर मायकोला कलाश्निक यांनी माहिती देताना सांगितले की, ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. काही निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मॉस्को आणि कीव यांच्यात थेट चर्चा सुरू असतानाच हा हल्ला झाला आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या या बैठकीत युद्धबंदी किंवा कोणत्याही तोडग्यावर एकमत होऊ शकले नाही. फेब्रुवारी २०२२मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले होते, ज्याला आता ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475