जिल्हा
धावपटू कार्तिक जोशीची ४२०० किमीची विक्रमी धाव
धावपटू कार्तिक जोशीची ४२०० किमीची विक्रमी धाव
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : आंतरराष्ट्रीय अल्ट्रा धावपटू कार्तिक जोशी याच्या कारगिल ते कन्याकुमारी (के-टू-के) या ४,२०० किलोमीटरच्या ऐतिहासिक धाव मोहिमेला स्केचर्सचे बळ मिळाले आहे. ठाण्यात पोहचलेल्या कार्तिकने ५५ दिवसांत ही मोहीम पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
कारगिल वॉर मेमोरियल येथून २ मे रोजी सुरू झालेल्या या प्रवासात कार्तिक याने झोजिला खिंड, डोंगराळ रस्ते, खडतर भूभाग, महामार्ग आणि शहरांमधील मार्ग पार केले आहेत. दररोज सरासरी ७० ते ८० किलोमीटर धावत त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला असून मुंबई आणि ठाणे येथे स्थानिक धावपटूंसोबत विशेष रनिंग उपक्रमात सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान कार्तिक स्केचर्सच्या ‘एअरो बर्स्ट’ आणि ‘एअरो स्पार्क’सह विविध रनिंग शूजचा वापर करत आहे. स्केचर्स साऊथ एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वीरा यांनी कार्तिक यांच्या जिद्द, सातत्य आणि उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करत त्यांच्या विक्रम मोहिमेला शुभेच्छा दिल्या.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475