जिल्हा
बदलापूरमध्ये पहिल्याच पावसात रस्ते पाण्याखाली
बदलापूरमध्ये पहिल्याच पावसात रस्ते पाण्याखाली
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : बदलापूरमध्ये आज पडलेल्या पहिल्याच पावसात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालक आणि नागरिकांचे हाल झाले.
कात्रप परिसरात मुख्य रस्त्यावर दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहना चालकांना संथगतीने मार्ग काढावा लागला. काही तासांच्या पावसानेच वाहतूक विस्कळीत झाली. पायी जाणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनाही गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागल्याने नाले सफाईच्या पालिकेच्या दाव्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पूर्वेतील पनवेल हायवेवरही पहिल्याच पावसात एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचल्याने पालिकेच्या नियोजनातील त्रुटी उघड झाल्या. शहरातील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर म्हणून ओळख असलेल्या या भागातही रस्त्याकडील गटारे आणि नाल्यांचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचून राहिले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475