जिल्हा

आजपासून तीन दिवस अतिमुसळधार पाऊस

आजपासून तीन दिवस अतिमुसळधार पाऊस
आजपासून तीन दिवस अतिमुसळधार पाऊस फोटो: ठाणे वैभव
ठाणे : भारतीय हवामान विभागाच्या ३० जून रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात 2 ते 4 जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे तसेच घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची व वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने समुद्र किनाऱ्यालगतच्या मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी भातशेती व भाजीपाला रोपवाटिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभाग, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475