जिल्हा

भाजपच्या ओवळा-माजिवडा विधानसभा सहसंयोजकाचा राजीनामा

भाजपच्या ओवळा-माजिवडा विधानसभा सहसंयोजकाचा राजीनामा
भाजपच्या ओवळा-माजिवडा विधानसभा सहसंयोजकाचा राजीनामा फोटो: ठाणे वैभव
नव्यांना संधी देऊन जुन्यांना डावलल्याचा आरोप ठाणे: भाजपामध्ये अवघ्या तीन वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या व्यक्तीला महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या निर्णयाविरोधात, आमदार निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीय ओवळा-माजिवडा विधानसभा सहसंयोजक अक्षय तिवरामकर व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकिता तिवरामकर यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गेल्या १०-११ वर्षांपासून अक्षय तिवरामकर, निलेश तिवरामकर आणि अंकिता तिवरामकर यांच्याकडून प्रभाग क्र. ७ मधील लक्ष्मी-चिरागनगर, वर्तकनगर, भीमनगर भागात कार्य केले जात आहे. यापूर्वी २०१७ मध्येही प्रभाग क्र. ७ मधून निलेश तिवरामकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्र. ७ मधून अक्षय तिवरामकर यांना उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी नाकारून अवघ्या तीन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपामधील पदांचा राजीनामा दिला असला तरी, `जनकल्याण फाउंडेशन'च्या माध्यमातून यापुढेही समाजकार्य करीत राहणार असल्याचे तिवरामकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475