देश-विदेश

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा फोटो: ठाणे वैभव
ढाका: बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानंतर आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून भारतामार्गे त्या लंडनला गेल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी तेथील लष्कराकडून प्रयत्न सुरु असून बांगलादेशमधील इंटरनेट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात येत होती. यासंदर्भात लाखोंच्या संख्येनी आंदोलकांनी ढाका शहरात मोर्चा काढला. तसेच शेख हसीना यांच्या कार्यालयावरही आंदोलक दाखल झाले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे शेख हसीना यांनी त्यांच्या बहिणीसह देश सोडून सुरक्षित स्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्दा तापलेला आहे. दरम्यान यावरून आज पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी असहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याशिवाय काही आंदोलकांनी ढाक्याच्या शाहबाग भागातील बंगबंधू शेख मुजीब वैद्यकीय महाविद्यालयासह या भागातील काही कार्यालय आणि आस्थापनांवरही हल्ले केले. विशेष म्हणजे काही आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन शाहबाग चौकात जमले, तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475