जिल्हा

ठाणेभूषण पिलु रिपोर्टर यांचे निधन

ठाणेभूषण पिलु रिपोर्टर यांचे निधन
ठाणेभूषण पिलु रिपोर्टर यांचे निधन फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्याचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पिलु दारा रिपोर्टर यांचे आज ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी होमाय व दोन सुकन्या असा परिवार आहे. सेंट जॉन दि बाप्टिस्ट स्कूल, या शाळेचे १९५५च्या बॅचचे ते माजी विद्यार्थी होते. क्रिकेट खेळाची उपजत आवड असलेल्या ठाण्याच्या आद्य झोरास्ट्रियन क्रिकेट संघात फिरकी गोलंदाज म्हणून त्यांचा समावेश होता. पण खेळापेक्षा क्रिकेटविषयक पुस्तक वाचनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यातुनच क्रिकेट पंचगिरी वयाच्या विशीत उद‌यास आली. मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित डॉ. एच. डी. कांगा साखळी सामन्यात डी. के. नाईक यांनी त्यांची पंच म्हणून नियुक्ती केली. पहिल्या सामन्याचे मानधन साडेचार रुपये होते. पिलु रिपोर्टर आणि ठाण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आकडेतज्ज्ञ सुधीर वैद्य यांचा १९९९ साली ठाणे महानगरपालिकेने 'ठाणे भूषण' म्हणून गौरव केला होता. पंचगिरी करण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांना एमसीएच्या पंच परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे असते. हे अभ्यास वर्ग मुंबईत आयोजित केले जातात. ठाण्याच्या मुलांसाठी रिपोर्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात प्रथमच अभ्यासवर्गाचे आयोजन केले. डॉ. प्रकाश वझे, शानबाग व विजय प्रधान ही या अभ्यास वर्गातील त्रिमूर्ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली. ठाणेवैभव करंडक, एन. टी. केळकर आणि घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, स्पोर्टिंग क्लब आयोजित शामराव ठोसर आणि डॉ. श्रीधर देशपांडे क्रिकेट स्पर्धा या स्थानिक स्पर्धातून पिलु रिपोर्टर यांचा पंच म्हणून नियमित सहभाग असायचा. १९८६-८७ साली पाकिस्तानमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज वि. पाकिस्तान मालिकेत पिलु रिपोर्टर- व्ही. के. रामस्वामी या पंचांनी क्रिकेट इतिहासात प्रथमच नेमले गेलेले 'तटस्थ पंच' म्हणून काम पाहिले. १९८४ साली डेव्हिड गोव्हरचा इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्या दौऱ्यात पिलु रिपोर्टर व एम. वाय गुप्ते या ठाण्याच्या पंचांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. १९८४ ते १९९३ दरम्यान रिपोर्टर यांनी एकूण १४ कसोटी तर १९८४ ते १९९४ दरम्यान त्यांनी २२ एकदिवसीय सामन्यात तसेच १३ प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. निवृतीनंतरही नवोदित पंचांना मार्गदर्शन करताना ते इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराथी भाषांचा माध्यम म्हणून उपयोग करीत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475