देश-विदेश

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; सोनेखरेदी टाळा

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; सोनेखरेदी टाळा
पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; सोनेखरेदी टाळा फोटो: ठाणे वैभव
वर्क फ्रॉम होम' सुरू करा-पंतप्रधान हैदराबाद : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले. 'वर्क फ्रॉम होम', ऑनलाइन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा. पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. ते म्हणाले, 'जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाकाळात आपण ऑनलाइन बैठका आणि 'वर्क फ्रॉम होम'ची सवय लावून घेतली होती. आता देशहितासाठी ती पद्धत पुन्हा अमलात आणण्याची वेळ आली आहे. यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही, तर देशाचे कोट्यवधींचे परकीय चलनही वाचेल.' युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आल्याने सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. सध्या या कंपन्यांना दररोज सुमारे १,६०० ते १,७०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. जर प्रत्येक नागरिकाने दररोज केवळ एक टक्का इंधन वाचवण्याचा संकल्प केला, तर भारत सरकारचे दरवर्षी तब्बल १४,८१९ कोटी रुपये वाचू शकतात. सध्या भारतात दररोज सुमारे १३.७ कोटी लिटर पेट्रोल आणि २९.४ कोटी लिटर डिझेल वापरले जाते. यामध्ये दुचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सचा वाटा सर्वाधिक आहे. जर आपण दररोज केवळ एक टक्का इंधन वाचवले, तर दररोज १३.७ लाख लिटर पेट्रोलची बचत होईल. दररोज २९.४ लाख लिटर डिझेलची बचत होईल. पंतप्रधानांनी विशेषतः सोन्याच्या खरेदीवर भाष्य करताना म्हटले की, मी देशाला आवाहन करतो की, किमान एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका. सोन्याच्या आयातीमुळे आपला मोठा पैसा परदेशात जातो. तो पैसा वाचवून बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी होईल, असे मोदींनी नमूद केले.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600