जिल्हा

खरे फ्लेमिंगो दुर्मिळ; पालिकेने उभारले प्रतिकात्मक फ्लेमिंगो

खरे फ्लेमिंगो दुर्मिळ; पालिकेने उभारले प्रतिकात्मक फ्लेमिंगो
खरे फ्लेमिंगो दुर्मिळ; पालिकेने उभारले प्रतिकात्मक फ्लेमिंगो फोटो: ठाणे वैभव
लोखंडी गेटमुळे कोपरीच्या खाडीचे सौंदर्य बंदिस्त ठाणे: ठाणे खाडीला रामसर स्थळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला; मात्र याच खाडीच्या कुशीत राहणाऱ्या कोपरीकरांना स्वतःच्या खाडीचे सौंदर्य पाहण्यासाठीच अडथळ्यांची भिंत उभी करण्यात आली आहे. एकीकडे जैवविविधतेच्या संवर्धनाच्या गप्पा आणि दुसरीकडे काँक्रीटचा विकास, अशी विसंगत अवस्था ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदरावर म्हणजे गणपती विसर्जन घाटावर पाहायला मिळत आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. सुमारे ६,५०० हेक्टर खाडी आणि कांदळवन क्षेत्राचे महत्त्व यामुळे सर्वांना समजले. मात्र स्मार्ट सिटी आणि वॉटर फ्रंट विकासाच्या नावाखाली चेंदणी बंदर परिसरातील नैसर्गिक छटा कमी करून मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण करण्यात आल्याने कोपरीकरांची ‘मिनी चौपाटी’ आपले नैसर्गिक सौंदर्य गमावत आहे. ठाणे खाडी ही फ्लेमिंगोसह सीगल्स, रानबदके, सँडपायपर, पेंटेड स्टॉर्क, स्पूनबिल यांसारख्या पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास क्षेत्र आहे. येथे २०० हून अधिक पक्षीप्रजातींची नोंद झाली आहे. मात्र खरे फ्लेमिंगो आणि पक्षी पाहण्याची संधी कमी होत असताना पालिकेने परिसरात प्रतिकात्मक फ्लेमिंगो उभारले आहेत. खऱ्या फ्लेमिंगोंचे दर्शन हिरावून घेऊन कृत्रिम फ्लेमिंगो दाखवण्याचा हा कसला विकास, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. खाडीत निर्माल्य टाकून प्रदूषण होऊ नये तसेच सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी गेट उभारण्यात आले. गेल्या दोन वर्षांत गेटवरून खाडीत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर येथे सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सुरक्षारक्षक असताना लोखंडी गेट कायम ठेवण्याचे प्रयोजन काय? असा थेट सवाल कोपरीकरांनी केला आहे. रामसरचा दर्जा म्हणजे केवळ फलक आणि प्रतिकात्मक फ्लेमिंगो नव्हे, तर खाडी, कांदळवन, पक्षी आणि नागरिकांचे निसर्गाशी असलेले नाते जपणे होय. त्यामुळे चेंदणी कोळीवाडा बंदरात सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने नागरिकांना खाडीचा अनुभव घेता यावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475