जिल्हा

नीट पेपरफुटीच्या निष्पक्ष चौकशीसाठी शहापुरात आंदोलन

नीट पेपरफुटीच्या निष्पक्ष चौकशीसाठी शहापुरात आंदोलन
नीट पेपरफुटीच्या निष्पक्ष चौकशीसाठी शहापुरात आंदोलन फोटो: ठाणे वैभव
शहापूर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शहापूर येथे विद्यार्थी, युवक, पालक आणि नागरिकांच्या सहभागातून शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा विशिष्ट विचारसरणीपासून अलिप्त ठेवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. दरम्यान शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करून उपस्थित वक्त्यांनी 'नीट' पेपरफुटी प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. आंदोलन संविधानिक मार्गाने, शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय रंग न देता त्यांच्या भविष्याचा विचार करून समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. आयोजकांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी, पालक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आणि शहापूरकर नागरिकांचे आभार मानले. तथापि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक मार्गाने हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475