जिल्हा
कडोंमपाचा लिपिक लाच घेताना अटक
कडोंमपाचा लिपिक लाच घेताना अटक
फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कडोंमपाच्या 'ब' प्रभाग क्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका लिपिकाला सहा हजार रुपये लाच घेताना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ बोराडे आहे. तो 'ब' प्रभाग क्षेत्र कार्यालयातील कर निर्धारण विभागात लिपिक पदावर कार्यरत होता.
एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराकडे शासकीय काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जात होती. तक्रारीची प्राथमिक चौकशी आणि ठोस पुरावे मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी 'ब' प्रभाग कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारत असतानाच बोराडेला जागीच ताब्यात घेण्यात आले. एसीबीने त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या अटकेनंतर कडोंमपा मुख्यालयात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475