जिल्हा

सुकलेल्या पानांपासून सेंद्रिय कंपोस्ट निर्मिती

सुकलेल्या पानांपासून सेंद्रिय कंपोस्ट निर्मिती
सुकलेल्या पानांपासून सेंद्रिय कंपोस्ट निर्मिती फोटो: ठाणे वैभव
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचा उपक्रम अंबरनाथ: सुकलेल्या पानांपासून सेंद्रिय कंपोस्ट खत तयार करण्याचे अभिनव उपक्रम रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थच्या वतीने राबवण्यात आला. अंबरनाथ शेतकरी सामुदायिक सहकारी सोसायटी (फार्मिंग सोसायटी), यांच्या कार्यालयाच्या आवारात सुकलेली पाने व बागेतील जैविक कचऱ्यापासून सेंद्रिय कंपोस्ट निर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे १० टन सुकलेली पाने व बागेतील जैविक कचरा शास्त्रीय पद्धतीने विघटित करून त्यापासून सेंद्रिय कंपोस्ट खताची निर्मिती केली जाणार आहे. सुकलेली पाने व नैसर्गिक कचरा जाळू नये, याबाबत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारही हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाची संकल्पना व सुरुवात रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष राजेश भावसार आणि फार्मिंग सोसायटीचे पदाधिकारी विश्वास म्हस्के, सचिव दीपक पवार आणि उपाध्यक्ष सावरडेकर यांच्यात झालेल्या चर्चेतून उपक्रम साकारण्यात आला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. निलेश जयवंत यांच्या हस्ते प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला नितीन महाजन, संदीप चौधरी आणि सिनेट बाळन यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉ. निलेश जयवंत, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे अध्यक्ष भावसार यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला क्लबचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष प्रकाश कोठारी, राजकुमार तोलानी, डॉ. राहुल चितरे, शिल्पा ठोंबरे, विजया बसनागर, प्रभाकर यादव आणि प्रकाश राव यांच्यासह रोटरी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600