जिल्हा

कांद्याचे दर चढेच!

कांद्याचे दर चढेच!
कांद्याचे दर चढेच! फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दर पुन्हा उसळी घेत आहेत. एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याने साठी पार केली असून किरकोळ बाजारात कांदा ८० रुपयांवर गेला आहे. एपीएमसी बाजारात नवीन कांदा दाखल होताच कांद्याचे दर आवाक्यात येतील अशी आशा होती. सुरुवातीला दर स्थिरावले होते. मात्र आता पुन्हा आवक कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. पडलेल्या पावसाने कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन आवक कमी झाली, त्याचबरोबर जुना कांदा कमी होत आहे. तसेच नाफेड कांदा ही आवक पुर्णतः बंद आहे, त्यामुळे दरवाढ होत आहे. घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो ६०-६५ रुपये तर किरकोळ बाजारात ८० रुपये दराने विक्री होत आहे. कांदा भाव वाढीमुळे शहरातील अनेक हॉटेल, वडापावच्या गाड्या, खानावळीतील ताटातून कांदा गायब होण्याच्या दिशेने आहे. हॉटेल व्यवसायिक यांच्याकडून थाळीसोबत कांद्याच्या एक-दोन फोड ग्राहकांना दिल्या जात होत्या, मात्र आता त्यांनी हात आखडता घेतला आहे. त्याचबरोबर भजी विक्रेत्यांनी कांद्याऐवजी आता पालकभजी विक्रीचा पर्याय निवडला आहे. कांद्याचे दर आणखीन वधारले तर कांदा खायचा कसा? असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475