जिल्हा

साडे तीन कोटींसह एटीएम व्हॅन पोलिसांच्या ताब्यात

साडे तीन कोटींसह एटीएम व्हॅन पोलिसांच्या ताब्यात
साडे तीन कोटींसह एटीएम व्हॅन पोलिसांच्या ताब्यात फोटो: ठाणे वैभव
मुंबई: नालासोपारा विधानसभेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत. अहवालानुसार, या एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. त्यावरून पोलिस आता तपास करत आहेत की ही रक्कम एटीएमसाठी होती, की निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार होती. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू असून, व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी व्हॅनमधील बॅगांमध्ये असलेली रक्कम जप्त केली आहे. तर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी 80 लाख एवढी रोख रक्कम कॅश व्हॅनमध्ये सापडली आहे. निवडणूकांच्या आचारसंहितेचा कॅश संदर्भात असलेली नियमावली पाळत नसल्याने, पोलिसांनी कॅश व्हॅन ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475