जिल्हा

बदली ग्रामीण पोलिसांना घरे खाली करण्याच्या नोटीसा

बदली ग्रामीण पोलिसांना घरे खाली करण्याच्या नोटीसा
बदली ग्रामीण पोलिसांना घरे खाली करण्याच्या नोटीसा फोटो: ठाणे वैभव

आ. संजय केळकर गृहराज्यमंत्र्यांना भेटणार

ठाणे : मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या ग्रामीण पोलिसांना निवासस्थानाअभावी ठाण्यातील पोलीस वसाहतीत राहावे लागत असून त्यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करून निवासाचा प्रश्न सोडवणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

भाजपाच्या खोपट येथील १३२व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ग्रामीण महिला पोलिसांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे निवासस्थानाबाबत गाऱ्हाणे मांडले. या पोलिसांची बदली मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात झाली असून तेथे राहण्याची व्यवस्था नसल्याने ठाण्यातील पोलीस वसाहतीत त्यांना हंगामी स्वरूपात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षणही ठाण्यातच होत असताना त्यांना ही घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत कर्तव्याच्या ठिकाणी घरांची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत ठाण्यातील घरे वापरता यावीत, अशी मागणी पोलिसांनी श्री.केळकर यांच्याकडे केली. याबाबत दोन दिवसांत गृहराज्यमंत्री आणि गृहसचिव यांना पत्र देऊन पोलीस कुटुंबांना दिलासा देणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.

काही शाळांतील पालकांनी देखील यावेळी स्कुलबसबाबत तक्रारी केल्या. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे स्कुल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असताना काही बसचालक चिनी बनावटीचे रद्द झालेले तकलादू कॅमेरे बसवत आहेत. स्कुल बसमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्यात यावेत, सर्व सुरक्षेचे नियम पाळण्यात यावेत यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याबाबत परिवहन आयुक्त आणि आरटीओ अधिकाऱ्यांशी बोलून दोषी बसचालकांचे परवाने निलंबित करण्याची सूचना केली असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.

स्व.आनंद दिघे यांनी जांभळी नाक्यावर १९८६साली सात गाळेधारकांचे पुनर्वसन केले असून त्यांच्यावर प्रभाग समितीने कारवाई केली. प्रभाग समितीचे अधिकारी कर्मचारी कारवाईबाबत सापत्न वागणूक देत असून रस्त्यावर बेकायदेशीरपणे बस्तान बसवलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई न करता अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या गाळे धारकांवर कारवाई केली जात आहे. याबाबत सहायक आयुक्तांना सक्त ताकीद दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. यावेळी नागरी आरोग्य समितीचे अध्यक्ष या नात्याने श्री.केळकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील आयुष्यमान आरोग्य केंद्रे आणि प्रसूती केंद्रे याबाबत पुढील काळात कोणत्या सुधारणा करता येतील यावर चर्चा करण्यात आली. श्री.केळकर यांनी यावेळी काही सुधारणाही सुचवल्या. 

कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा येथील इमारत क्र. १८मधील गाळेधारकांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांचे आभार मानले. इमारतीचा पुनर्विकास झल्यांनंतर गेली अडीच वर्षे गाळ्यांचा ताबा देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. याबाबत श्री.केळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्यांना ताबा पावती देण्यात आली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475