जिल्हा
लाच घेताना नायब तहसिलदार ताब्यात
लाच घेताना नायब तहसिलदार ताब्यात
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : भिवंडी तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार सिंधु खाडे (५२) यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. खाडेंनी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी ५० हजार रुप.यांची लाच स्विकारली.
या प्रकरणातील तक्रारदार व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या अशिलांचे फेरफार हरकत नोंदणी प्रकरण लोकसेविका खाडे यांच्याकडे होते. या प्रकरणाचा अंतिम अहवाल व त्याची प्रत देण्यासाठी सौ. खाडे यांनी दीड लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. याची लेखी तक्रार २९ मे २३ रोजी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने २९ मे २०२३ रोजी केलेल्या पडताळणीमध्ये खाडे या तक्रारदारांकडे दीड लाख रुपयांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने १ जुन २३ रोजी आयोजिलेल्या सापळा कारवाई दरम्यान सिंधु खाडे यांनी तक्रारदारांकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून स्विकारले असता त्यांना दुपारी १.०९ वाजता लाचेच्या रकमेसह रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475