जिल्हा

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर फोटो: ठाणे वैभव
मुंबई: शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली याची माहिती अद्याप नाही. मात्र, शरद पवार काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तर या भेटीनंतर गौतम अदानी यांनी श्री.पवार यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली. या दोन भेटींनी राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आणि या आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. त्यामुळे, शरद पवारांची ही भेट कामानिमित्त असली तर याची राजकीय चर्चा राज्याच्या वर्तुळात होत आहे. या भेटीची अनेक पैलूंनी चर्चा केली जात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदेश दौऱ्यावर असताना ही भेट होत असल्यानेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच, ही राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475