जिल्हा

नाताळनिमित्त बंदी करणार तोंड गोड

नाताळनिमित्त बंदी करणार तोंड गोड
नाताळनिमित्त बंदी करणार तोंड गोड फोटो: ठाणे वैभव
ठाणे कारागृहात नाताळ उत्पादनांतून नऊ लाखांचे उत्पन्न ठाणे : ख्रिस्ती बांधवांच्या ख्रिसमस सणास सुरुवात झाली असून त्यानिमित्ताने खमंग पदार्थांनी शहरातील बेकरी सजल्या आहेत. यात विविध प्रकारांचे केक, मिठाई आणि इतर गोड पदार्थ तयार केले जात आहे. यात भर पडली आहे ती कैद्यांनी बनवलेल्या केकची. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कैद्यांनी तयार केलेल्या केकला जास्त मागणी आली असून उत्पन्नात देखील भर पडली आहे. ठाणे कारागृहाने नाताळ उत्पादन नऊ लाखांचे उत्पन्न केले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातही बंदींनी या सणानिमित्त गोड पदार्थ बनवले आहेत. हे पदार्थ ठाणे मध्यवर्ती कारागृहासह इतर दहा ठिकाणी पाठवण्यात आले असून यातून कारागृहाच्या बेकरी विभागाने नऊ लाख 5487 इतके उत्पन्न मिळवून दिले आहे. बंद्यांच्या हातांना काम देऊन त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती विभागात कारखाना विभाग सुरू आहे. यात सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण आदी काम सुरू असते. बेड, डायनिंग टेबल, देव्हारे, कपडे शिवणे, बिस्किटे, फरसाण, कापड बनवणे यासारख्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ या कारखाना विभागात बंदी बनवत असतात. विशेषतः दिवाळी-नाताळनिमित्त या बेकरी विभागात विविध फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या बेकरी विभागात नाताळचे औचित्य साधून कप केक, स्पंज केक, साधे पाव तयार करण्यात आले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ठाणे कारागृहातील बंदी या कामात गुंतले होते. यात मुंबई मध्यवर्ती कारागृह (आर्थर रोड), तळोजा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह (आधारवाडी जेल), ठाणे मध्यवर्ती कारागृह, सेंटर फॉर पीस ट्रस्ट प्रिझन मिनिस्ट्री इंडिया, लता सांगोलकर अ न्याय विभाग, विक्री केंद्र रेखा फटांगरे, होम ऑफ फेद, फेलोशिप ऑफ लव ग्रेस मध्ये येथून या पदार्थांना मागणी आली होती. त्यात कप केकला जास्त मागणी आली. यंदा कारागृहाने 29,279 कप केकची विक्री करून चार लाख 39,185 रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तर अर्धा किलोचे 2507 स्पंज केक विक्री केले आहेत. यातून कारागृहाला चार लाख 66,302 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कप केकची किंमत 15 रुपये, तर स्पंज केक अर्धा किलोला 186 रुपये आणि एक किलो स्पंज केकला 372 रुपये अशी किंमत आहे. कप केकला ठाणे मध्यवर्ती कारागृह, तर स्पंज केकला मुंबई आणि तळोजा कारागृह या ठिकाणाहून अधिक मागणी आली. 29,279 नग केक कपातून 43 लाख 9,185 रुपये, 2507 किलो स्पंज केकमधून दोन लाख 46,302 रुपये मिळाले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475