जिल्हा

माजी नगरसेवक मंगेश कोळी भाजपात

माजी नगरसेवक मंगेश कोळी भाजपात
माजी नगरसेवक मंगेश कोळी भाजपात फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाण्यात काँग्रेसचे निष्ठावंत आणि दोनवेळा काँग्रेसचे आमदार असलेल्या कै. कांती कोळी यांचे संपूर्ण कुटुंब आज भाजपवासी झाले. माजी नगरसेवक मंगेश कोळी आणि त्यांची पत्नी नीता कोळी यांनी आज आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे आणि शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार स्व. कांती कोळी यांच्या कुटुंबातील जयेंद्र कोळी, त्यांची पत्नी नम्रता कोळी यांनी यापूर्वीचा भाजपाचे कमळ हाती घेतले असून त्या महापालिकेत नगरसेविका आहेत. परेश कोळी यांनी देखील भाजपामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे, त्यामुळे आज माजी नगरसेवक मंगेश कोळी यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. श्री. कोळी यांच्या प्रवेशाच्या वेळी शेकडो महिला उपस्थित होत्या, यात उत्तर भारतीय आणि अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांची संख्या लक्षणीय होती. भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथिल कार्यालयात राष्ट्रवादीचे संदीप जाधव, मयूर शिंदे यांनी देखील प्रवेश केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475