जिल्हा

मुंब्र्यातील प्रकरणावरून मनसे आक्रमक

मुंब्र्यातील प्रकरणावरून मनसे आक्रमक
मुंब्र्यातील प्रकरणावरून मनसे आक्रमक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंब्र्यातील फेरीवाल्याला मराठीत बोला असे असे सांगणाऱ्या तरुणाला जाहीर माफी मागायला लावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर आता या विरोधात मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी संध्याकाळी ४च्या सुमारास मुंब्र्यातील कौसा भागात २१ वर्षीय तरुण एका फळ विक्रेत्याकडे फळं खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा फळविक्रेत्याने हिंदीत संवाद सुरू केल्यावर तरुणाने त्याला ‘मराठीत बोला’ असे सांगितले. त्यावरून फळविक्रेता व तरुणामध्ये वाद झाला. यानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही बोलावले. आसपास गर्दी जमा झाली. या सगळ्यांनी मिळून तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडले. यावेळी जमलेल्या लोकांनी तरुणाला शिवीगाळ केल्याचाही दावा करण्यात आला आहे. या तरुणाची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी झाल्यानंतर त्याने आपल्याला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी मला शिवीगाळ केली. मी म्हटलं शिव्या देऊ नका. तर त्यांनी मला माफी मागायला सांगितली. मी माफीही मागितली. पण मला नंतर पोलीस स्टेशनमध्ये चार तास बसवून ठेवले. माझ्या आईलाही स्टेशनबाहेर बसवून ठेवले असल्याची माहिती या तरुणाने दिली आहे. या सर्व प्रकारानंतर या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर अविनाश जाधव यांनी देखील यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांत मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातली ही घटना दुर्दैवी आहे. मराठी भाषेवरून वाद झाल्यानंतर तिथे काही मुस्लिम समाजाची मुले जमली. त्यांनी व्हिडीओही रेकॉर्ड केला. महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही असे ये म्हणतात आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात? त्यांची एवढी हिंमत कशी होते?” असा सवाल जाधव यांनी केला आहे. कल्याण, ठाणे, विरार, मुंबईत घडणाऱ्या घटना पाहिल्या, तर सत्तापरिवर्तन झाल्यानंतर यांच्यातली हिंमत मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याचे दिसत आहे. मुंब्र्यातल्या घटनेनंतर त्या तरुणावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असा संताप श्री.जाधव यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475