जिल्हा

मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक

मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक
मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक फोटो: ठाणे वैभव
मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्याविरोधात दंड थोपटले असून मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला. याबाबत येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरूग्णालयातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील ब्रिटिशकालीन प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात ३३०० बेडचे बंगलोरच्या धर्तीवर नविन मनोरुग्णालय उभारण्यात येत आहे. या बांधकामाच्या आड येणाऱ्या १६१४ झाडांपैकी ७०० हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. वृक्षतोडीच्या वृत्तानंतर ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने शुक्रवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासन आणि बिल्डरांकडुन जागा लाटण्याकरिता हे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करून मनसे नेते अविनाश जाधव यांनी या ठिकाणी सेंट्रल पार्क तयार करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः देखील ठाणे मनोरुग्णालयात भेट देऊन वृक्षांची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. मनोरुग्णालयातील एकही झाड तोडून देणार नाही, असा इशारा मनसेने दिला असून या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकरांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475