जिल्हा

ठाण्यासह सर्व महापालिका निवडणुकांत होणार महायुती

ठाण्यासह सर्व महापालिका निवडणुकांत होणार महायुती
ठाण्यासह सर्व महापालिका निवडणुकांत होणार महायुती फोटो: ठाणे वैभव
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत एकमत * नवी मुंबईबाबत सस्पेन्स कायम ठाणे: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीच्या अनुषंगाने श्री.शिंदे यांच्या नागपूरमधील देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत अखेर तोडगा निघालेला आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवण्यावर एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी चर्चा सुरू होणार आहे. तसेच दोन्ही पक्ष स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक कमिटी स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 8 डिसेंबर रोजी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जायचे यासंदर्भात चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि इतर महत्वाच्या पालिका यात युती व्हायलाच पाहिजे, यावर युतीतील नेत्यांचे एकमत झाले. पुन्हा एक बैठक व्हायला हवी असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानुसार काल मी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलो होतो, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475