जिल्हा

स्व.आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी परप्रांतीय मुक्कामास

स्व.आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी परप्रांतीय मुक्कामास
स्व.आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी परप्रांतीय मुक्कामास फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय नागरिक झोपत असल्याची बाब समोर आल्यानंतर परिसरात चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तत्काळ घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकरणाची दखल घेऊन मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करून तेथे झोपणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संबंधित नागरिकांनी आपण जवळील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्यांच्या घरांचे बांधकाम पत्र्याचे असल्यामुळे दिवसभराच्या तीव्र उष्णतेनंतर घरात प्रचंड उकाडा निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोपण्यासाठी मैदानावर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सार्वजनिक मैदाने आणि बागांचा मुक्कामासाठी वापर होत असल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षेचा तसेच स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांच्या फिरण्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी असलेल्या सार्वजनिक जागांचा अशा प्रकारे वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाहणीदरम्यान मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी ही भेट दिल्याचे सांगितले. तसेच मैदानावर झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिस प्रशासनाला लेखी पत्र देणार असून, स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475