जिल्हा

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट
अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: येथील आंनदनगर अतिरिक्त एमआयडीसीमधील श्री गणेश केमिकल कंपनीमध्ये आज सायंकाळी भीषण स्फोट होऊन कंपनी जळून खाक झाली आहे. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या कंपन्या व ठाकुरपाडा या आदिवासी वस्तीलाही त्याच्या झळा पोहचल्या आहेत. मात्र सुदैवाने या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते. अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीसी परिसरात श्री गणेश प्रोसेस इक्विपमेंट्स रासायनिक कंपनीत फ्लुइड बेड ड्रायर आणि इतर औद्योगिक प्रक्रिया उपकरणे यासारख्या उत्पादने केली जातात. याच कंपनीत आज सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ही कंपनी जळून खाक झाली. ही आग विझवण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण येथील आगीचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचल्या असल्या तरी तरी रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते. या संपुर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने घटनास्थळी हजर होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475