व्हिडिओ

मराठी दिनानिमित्त 'मराठी स्वाक्षरी मोहिम' !

मराठी दिनानिमित्त 'मराठी स्वाक्षरी मोहिम' !
मराठी दिनानिमित्त 'मराठी स्वाक्षरी मोहिम' ! फोटो: ठाणे वैभव
आज मराठी राजभाषा दिनानिमित्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्यनेते व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व प्रवक्ते श्री नरेशजी म्हस्के यांच्या सहकार्याने नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नौपाडा विभाग आयोजित मराठी स्वाक्षरी मोहिम व मराठी गौरव गीतांचा कार्यक्रम आज सकाळी ठाणे रेल्वे स्थानक येथे मोठ्या उत्साहात पार पडला . शेकडो नागरिकांनी मराठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेत आनंद व्यक्त केला. तसेंच हरीश व पंकज या गायकांनी मराठी गौरव गीत, पोवाडा, महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. प्रसंगी शिवसेना सचिव व ठाणे परिवहन सभापती श्री विलास जोशी , माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री भास्कर पाटील, उपविभागप्रमुख श्री दिनेश सकपाळ, शाखाप्रमुख श्री विजय डावरे, गौरव चिंगळे, उपशाखाप्रमुख अशोक कदम, बाळा पावसकर,ऋषिकेश कदम, रघुनाथ रसाळ, केदार जोशी, दिनकर गुरव, संजय पवार तसेच इतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनाबद्दल अनेकांनी आयोजक किरण नाकती यांचे आभार मानले. https://www.youtube.com/watch?v=arfjpfBIXBI

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475