महाराष्ट्र

ठाण्यात मराठा समाज सर्वेक्षण आजपासून सुरू

ठाण्यात मराठा समाज सर्वेक्षण आजपासून सुरू
ठाण्यात मराठा समाज सर्वेक्षण आजपासून सुरू फोटो: ठाणे वैभव
ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवार २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. सदरचे सर्वेक्षण हे शासकीय यंत्रणेमार्फत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लीकेशनद्वारे करण्यात येत आहे. यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे नागरिकांचे सर्वेक्षण महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असून याकामी २५० पर्यवेक्षक आणि सुमारे चार हजार प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभाग कार्यालयाकडील सहायक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर व कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांचे अधिनस्त प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज पार पाडण्यात येणार आहे. नेमण्यात आलेल्या सर्व पर्यवेक्षक व प्रगणक यांना रविवार २१ जानेवारी आणि सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी प्रशिक्षण देण्यात आले. शासनाच्या वतीने महानगरपालिकेने नियुक्त केलेले प्रगणक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करणार आहेत. तरी सदर सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. सर्वेक्षणादरम्यान ॲपच्या माध्यमातून प्रश्नावलीमध्ये नागरिकांनी दिलेली माहिती नोंदविण्यात येणार आहेत. सदर सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महानगरपालिकेमार्फत हेल्पलाईन सुविधा (८६५७८८७१०१) उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना असल्यास यावर नोंद करु शकतील. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने सुरू असलेल्या या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475