महाराष्ट्र

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथे भव्य दीपोत्सव आणि महाआरती

माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथे भव्य दीपोत्सव आणि महाआरती
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथे भव्य दीपोत्सव आणि महाआरती फोटो: ठाणे वैभव
ठाणे: अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली दिवा चंद्रागण रेसिडेन्सी येथील श्री दत्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवा प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भजन, वारकरी संप्रदायच्या वतीने हरिपाठ तसेच सायंकाळी ७ वाजता ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव तसेच माजी आमदार सुभाष भोईर यांनी भगवान श्रीरामांची सपत्नीक पूजा केली. त्यावेळी श्रीरामांच्या जय घोषात संपूर्ण परिसर राममय झाला होता. यावेळी सुमित सुभाष भोईर व भोईर कुटुंबीयांसह महाआरतीला मोठ्या प्रमाणावर रामभक्त, भाविक भक्तगण उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475