जिल्हा

पब्जी गेममध्ये पराभव झाल्याने एकावर चाकू हल्ला

पब्जी गेममध्ये पराभव झाल्याने एकावर चाकू हल्ला
पब्जी गेममध्ये पराभव झाल्याने एकावर चाकू हल्ला फोटो: ठाणे वैभव
ठाणे : पब्जी या मोबाईल गेममध्ये पराभव झाल्याने तीन अल्पवयीन मुलांनी एकावर चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वागळे इस्टेट भागात उघडकीस आला आहे. जखमी मुलगा देखील अल्पवयीन असून याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पब्जी या मोबाईल गेमवर भारतात बंदी आहे. असे असतानाही मोबाईलमध्ये गेम उपलब्ध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जखमी १७ वर्षीय मुलगा वागळे इस्टेट येथील रामनगरमधील वाल्मिकी पाडा येथे कुटुंबासह राहतो. परिसरातील मित्रांसोबत तो नेहमी मोबाईलवर पब्जी गेम खेळत असे. १० जुलैला परिसरातील एका उद्यानात पब्जी गेम खेळताना एका मुलाचा पराभव झाल्यानंतर त्याची चेष्टा करण्यात आली. त्यावेळी संतापलेल्या त्या मुलाने चाकू आणून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नातेवाईकांनी त्याला समजावून घरी नेले होते. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जखमी मुलगा दोन मित्रांसोबत रामनगरातील सार्वजनिक स्वच्छतागृह परिसरात बसला होता. त्यावेळी तिघे अल्पवयीन मुले दुचाकीवरून तेथे आले. काही वेळ बोलण्यानंतर दोघांनी अचानक चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या छाती, पोट आणि डाव्या हातावर वार करण्यात आले. हल्ल्यानंतर तिघेही दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेला मुलगा घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475