महाराष्ट्र

महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी आज?

महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी आज?
महायुतीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी आज? फोटो: ठाणे वैभव
मुंबई : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १० ऑक्टोबरला नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी विजयादशमीच्या मुहूर्तावर जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र महायुती यात आघाडी घेण्याची शक्यता आहे. पितृपक्षाच्या काळात उमेदवारांची घोषणा, जागावाटप जाहीर करणं या गोष्टींना ब्रेक लागला होता. मात्र उद्या घटस्थापनेसह नवरात्राचा आरंभ होत आहे. पहिल्याच दिवशी महायुती उमेदवार यादीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सह्याद्री अतिथिगृहावर नुकतीच भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचे सूत्र अंतिम झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आधीपासूनच सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. इच्छुक उमेदवारांनीही कंबर कसली असून राजकीय नेत्यांच्या 'उड्या'ही सुरु झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475