महाराष्ट्र

कोपरी परिसरात ५०० कुटुंबांचा गॅसपुरवठा खंडित

कोपरी परिसरात ५०० कुटुंबांचा गॅसपुरवठा खंडित
कोपरी परिसरात ५०० कुटुंबांचा गॅसपुरवठा खंडित फोटो: ठाणे वैभव
जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस वाहिनीला गळती ठाणे : ठाणे महापालिकेचे ड्रेनेजचे काम सुरु असताना जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस वाहिनीला गळती लागल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता कोपरी परिसरात घडली आहे. गॅसवाहिनीला गळती लागल्याने या परिसरातील ५०० पेक्षा अधिक कुटुंबांचा गॅसपुरवठा बंद झाला. ऐन घटस्थापनेच्या एक दिवस आधीच हा सर्व प्रकार घडल्याने नागरिकांकडून विकासकाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तर गॅसवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून संध्याकाळी उशिरापर्यंत गॅसपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महानगर गॅसच्या वतीने देण्यात आली आहे. कोपरी परिसरातील नाखवा स्कूलजवळ, काशी आई मंदिराच्या बाजूला ठाणे महापालिकेचे मे.अथर्व कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत ड्रेनेज विभागाच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना दुपारी १२.३४च्या सुमारास या कामासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा धक्का या परिसरात असलेल्या गॅस वाहिनीला लागला. त्यामुळे गॅस वाहिनीमधून गळती सुरु झाली. या घटनेची माहिती कोपरी अग्निशमन दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी, कोपरी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी गॅस वाहिनीचा मुख्य वॉल्व बंद केला. तसेच गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु करण्यात आले. या घटनेमुळे मात्र कोपरी परिसरातील सुमारे ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा दुरुस्तीचे काम होईपर्यंत बंद करण्यात ठेवण्यात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475