जिल्हा
ठाण्यात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
ठाण्यात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिसे व शहाड येथील अशुद्ध जलउद्वहन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा अडकल्याने पंपांचा डिस्चार्ज कमी झाला आहे. परिणामी शुद्ध पाण्याच्या साठ्याची पातळी राखण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी अंडरवॉटर डायव्हिंग टीमच्या माध्यमातून युद्धपातळीवर गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि मुख्य वितरण व्यवस्थेतील समतोल राखण्यासाठी शहरात झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ठाणे शहरात पाणीपुरवठा अनियमित तसेच कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475