जिल्हा

फोन उचलला नाही म्हणून नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण

फोन उचलला नाही म्हणून नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण
फोन उचलला नाही म्हणून नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण फोटो: ठाणे वैभव
* डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील घटना * डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन कल्याण : डॉक्टरांनी फोन न उचलल्याने संतापलेल्या सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण केली. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ही मारहाण केली असून मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन झालेली घटना सांगितली असून रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या घटनेत दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी संबंधित डॉक्टरांना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच याप्रकरणी आपण पूर्णपणे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांशी देखील बोललो असल्याचे आयुक्तांनी सांगितले. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर आयसीयूमध्ये दाखल करावे लागणार असल्याने डॉक्टरांनी त्यांना वसंत व्हॅली येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र आम्हाला शास्त्रीनगर रुग्णालयातच उपचार हवे यांवर महिलेचे कुटुंबीय ठाम होते. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टरांनी कामाच्या व्यस्ततेमुळे फोन न उचलल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारत बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर कडोंमपातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संतप्त झाले असून त्यांनी संप पुकारला आहे. या संपात सुमारे 450 ते 500 डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी झाले असून मारहाण करणाऱ्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर आता काय कारवाई होते हे पाहावे लागेल. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475