जिल्हा

मदतीला गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

मदतीला गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला
मदतीला गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. मात्र, राहुल तायडे नावाच्या तरुणाने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. काठीने हल्ला करत मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475