जिल्हा

खो-खो विश्वविजेत्या रेश्माचे बदलापुरात जंगी स्वागत

खो-खो विश्वविजेत्या रेश्माचे बदलापुरात जंगी स्वागत
खो-खो विश्वविजेत्या रेश्माचे बदलापुरात जंगी स्वागत फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: नुकत्याच पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला संघाने अद्वितीय कामगिरी करत चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बदलापूरच्या रेश्मा राठोड हिचेही मोलाचे योगदान होते. बदलापूरच्या शिवभक्त शाळेचे विद्यार्थिनी असलेल्या रेश्माचा राठोडचा गुरुवारी शाळेने मिरवणूक काढून गौरव केला. पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी विजय मिळवला होता. महिला संघाने नेपाळ संघावर 78-40 अशी मात केली. या स्पर्धेत सर्वच महिला खेळाडूंचे योगदान अमूल्य होते. सोबतच देशभर या महिला खेळाडूंचे कौतुक झाले. भारताच्या महिला खो खो संघात बदलापूरच्या रेश्मा राठोड हिचाही समावेश होता. रेश्माने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे तिला गौरविण्यातही आले होते. विश्वचषक जिंकल्यानंतर रेश्मा राठोडचे कौतुक होत होते. बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदिर शाळेची माजी विद्यार्थीनी असलेली रेश्मा हिच्या गौरवासाठी गुरुवारी बदलापुरात मिरवणूक काढण्यात आली. शहरभर ही मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी रेशमाचे कौतुक केले जात होते. शिवभक्त विद्या मंदिरचे प्रमुख आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यावेळी उपस्थित होते. खुल्या जीपमधून रेश्माची मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. रेश्मा राठोड ही उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयाची पदवीधर विद्यार्थिनी होती. रेश्माचे वडील संतोष राठोड ट्रकचालक असून तिची आई गृहिणी आहे. त्यानंतरही परिस्थितीवर मात करत रेशमाने केलेल्या कामगिरीचे शहरभर कौतुक होते आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475