जिल्हा

अडीच वर्षाचा मुलाच्या कमरेत अडकून राहिले इंजेक्शन

अडीच वर्षाचा मुलाच्या कमरेत अडकून राहिले इंजेक्शन
अडीच वर्षाचा मुलाच्या कमरेत अडकून राहिले इंजेक्शन फोटो: ठाणे वैभव
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा कळस शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकडून हॉस्पिटल मधील जबाबदार व्यक्तीवर कारवाईची मागणी कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील उपचारांबाबत आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. अडीच वर्षीय मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई मुलाच्या कमरेतच राहिल्याचे एक्स-रे नंतर समोर आले. ऑपरेशन करून मुलाच्या कमरेतून सुई काढण्यात आली. कुटुंबीयांनी मुलाची तपासणी करून एक्स-रे काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमित कोळेकर यांनी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणाऱ्या सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे हे दोघे आपल्या अडीच वर्षाचा मुलगा कविष याला घेऊन रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आले होते. मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मुलाला रेबीजचे इंजेक्शन दिले मात्र इंजेक्शनची सुई मुलाच्या कमरेत राहिली. काजल पांडे यांनी सांगितले की मुलाची सुई बाहेर आलेली नाही मात्र डॉक्टरांनी सांगितले की ती इकडे तिकडे पडली असेल तुम्ही मुलाला घेऊन जा. थोड्या वेळानंतर मुलाला त्रास होऊ लागला. आई-वडील मुलाला घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये गेले. त्या ठिकाणी देखील त्यांना बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुलाला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अडकलेली सुई ऑपरेशन करून काढण्यात आली. या प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांनी हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. आमच्या मुलासोबत हा प्रकार झाला, मात्र दुसऱ्या मुलासोबत असा प्रकार व्हायला नको, असे त्यांचे म्हणणं आहे. दरम्यान, या घटनेनंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील कामकाज आणि उपचार पद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमित कोळेकर यांनी रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन किंवा महापालिकेकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475