जिल्हा
अजित पवार गटाची काँग्रेस कार्यालयावर शाईफेक
अजित पवार गटाची काँग्रेस कार्यालयावर शाईफेक
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करत ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर शाई फेकून संताप व्यक्त केला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्रांचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार व अवमानकारक वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधितांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475